सिंहगड आणि लगतच्या गावांमध्ये पाऊस झाला. दुपारपर्यंत आणि तीनच्या दरम्यान अचानक पाऊस सुरू झाला. या पावसामुळे कामासाठी बाहेर पडलेल्या लोकांची धावपळ झाली. आठवडाभरात तापमान वाढले होते तर दिवस-रात्र उकाड्याने पुणेकर हैराण झाले होते, पण काही वेळासाठी पाऊसाने तरी दिलासा मिळाला.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने शुक्रवारी दिलेल्या मुलाखत मध्ये शहरात दुपारनंतर मेघगर्जना सह पावसाची शक्यता असणार आहे अशी प्रतिक्रिया दिली होती. पाऊस पडण्यापूर्वी काही वेळ शहरावर तर ते 13 किलोमीटर उंचीचे तयार झाल्याचे चित्र प्रसिद्ध केलेल्या नकाशातून स्पष्ट झालेले दिसून आले.
मान्सून परतीचा प्रवास सुरू झाल्याने आता पाऊस संपला असा नागरिकांचा समज झाला आहे पण गेल्या आठवडाभरात शहरात पाऊस पडला नव्हता. तापमान वाढल्यामुळे दिवसभर उकाडा आणि उन्हाचे चटके बसत असल्यामुळे शनिवारी सकाळी देखील उकाडा वाढला होता. उन्हाची तीव्रता जास्त होती आणि वारे, वादळी वाऱ्यासह पावसाने शहरात हजेरी लावली. जोरदार मुसळधार पाऊस पडला.पडलेल्या पावसाने अनेकांना धावपळ करावी लागली.
सिंहगड रस्ता, सारसबाग, कात्रज, हडपसर, कोंढवा, एरंडवणे, कर्वे रस्ता, डेक्कन परिसरांमध्ये पाणी झाले होते. काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते तर पाण्याचा वेग असल्यामुळे रस्तावरून जाणारी वाहतूक थांबली. वेग पाहून लोक गाड्या रस्त्याच्या कडेला लावून सुरक्षित जागी उभे राहिले. काही भागात भाडा झाडांच्या फांद्याही कोसळल्या, वीज पुरवठा खंडित झाला, तासभर जोराचा पाऊस झाल्यानंतर, पाऊसाचा वेग कमी झाला. पुढील दोन दिवस शहरांत दुपारनंतर मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे.
राज्याच्या अनेक भागात पाऊस पडून सांगली शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाचे थैमान घातले. मेघगर्जना होऊन जोरदार पावसाने शेतीच्या कामात अडथळे निर्माण झाले आहे. जोरदार अति वेगाचा पावसामुळे भात, सोयाबीन, भुईमूग, पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुपारनंतर कोल्हापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विजांचा कडकडाट, मेघगर्जना गडगडाट आणि जोरदार वाऱ्यासह, वादळ, तुफान पाऊस पडत आहे. मुंबईतही दुपारपासून वातावरण पूर्णपणे बदलले असून ढगांच्या दाटीने दृश्य मानता कमी झाली आहे. ढगांचा गडगडाट सुरू असला तरी पावसाचे प्रमाण मात्र कमी वेगाचे आहे. ठाणे, पनवेल, नवी मुंबईतही अशी पाऊसाची स्थिती आहे.

टिप्पणी पोस्ट करा
if you have any doubts, Please let me know