सकारात्मक विचारातुन चांगले जीवन

आयुष्य जगत असताना आपले विचार ...

 

सकारात्मक विचारातुन चांगले जीवन...

 

आपल्या जीवनात मला काय हवंय?

जीवनात यावर लक्ष केंद्रीत केल्यानंतर घरी, समाजात, आणि जगात जिथे जाल, तिथे मला काय हवंय? असं  स्वतः च्या मनाला विचारा,अगदी शांत राहुन सकारात्मक गोष्टीचा आपण विचार करू शकतो.

 

सकारात्मक विचार.

सकारात्मक विचार म्हणजे एखाद्या गोष्टी कडे पाहताना त्यात चांगल्या बाजूचा विचार करणे.

 

आपल्या कुटुंबामध्ये मला काय हवंय?

कुटुंबात नेहमी हे विचार बाळगावे.
कुटुंबात नेहमी सकारात्मक विचार, सकारात्मक संवाद असायला पाहिजे. जेणेकरून घरातलं वातावरण आपल्याला प्रेम,आनंद आणि शांती ची प्रेरणा देईल.
घरातील व्यक्ती योग्य दृष्टीने सकारात्मक विचार करतील तर आपली सगळी कामे सहजतेनं व्हावीत, जेणेकरून
घरातील कामे आणि करियर याचे नियोजन आपण व्यवस्थित करू शकतो.
आपल्या मुलांनी घरकामात मदत करावी अशी पालकांची  ती इच्छा ,आमचं नातं, प्रेम आणि आनंदानं भरलेलं असावं.
आपल्या कुटुंबात कृतज्ञता आणि प्रेम भावना असल्या पाहिजे जेणेकरून प्रेम,आनंद आणि शांतीसह, सुखी जीवन आपण जगू शकतो.
आपले घर स्वर्गासारखं सुंदर व्हावं, जेणेकरून आपण प्रेम आणि विश्वासाची भावना जाणू शकतो.

 

आपल्याला कामाच्या ठिकाणी,ऑफिसमध्ये काय हवंय?

ऑफिस बद्दल नेहमी असे विचार बाळगावे.
आपल्या ऑफिसमध्ये विश्वासार्ह आणि निष्ठावान सहकर्मचारी असावे,जेणेकरून आपण उत्तम व्यक्ती, वस्तूंची निर्माण केल्याचं जगात समाधान आनंदी वाटेल.
ऑफिसमध्ये सहजता असली पाहिजे जेणेकरून सर्वजण आनंदी आणि स्वस्थ राहतील.
आपल्या  प्रत्येक कामात स्वताः बरोबर इतरांचाही जीवनात प्रगती व्हावी असं वाटले पाहिजे, जेणेकरून सर्वजण प्रेम, आनंद, शांतीसह प्रगतीच्या उच्च स्तरावर जातील.
आपल्याला नवीन, भावनात्मक, आव्हानात्मक गोष्टी करण्याचे जिद्द असायला पाहिजे, जेणेकरून आपल्या प्रेमामुळे इतरांच्याही सर्वकाही करायची शक्यता निर्माण होईल.
आपण आणि आपले बॉस दोघांमध्ये चांगले विश्वासाचे संवाद बनले पाहिजे, जेणेकरून आपण कंपनीच्या प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी मोकळ्या मनानं, प्रेम आणि आनंदानं मांडू शकतो.
आपल्याला भरपूर पगार, प्रमोशन आणि सर्वाच सहकार्य असायला पाहिजे, जेणेकरून स्वतःची जबाबदारी पार पाडून कंपनीच्या प्रगती साठी हातभार लावू शकतो.
आपले प्रत्येक कामात यशस्वी असले पाहिजे, जेणेकरून आपले संपुर्ण जीवन आनंदी बनेल. स्वप्ने पुर्ण होईल.
आपल्या सोबत काम करताना सुरक्षितता, चांगले भावना आणि सजगतेचा अनुभव घ्यायला पाहिजे. जेणेकरून इतरांना आपल्याबरोबर काम करताना प्रेम आणि आनंद मिळवू शकतो.
कामात मैत्री पूर्ण नातं असले पाहिजे.जेणेकरून आपल्या कामात यशस्वी होऊ शकतो.

 

समाजात आपल्याला काय हवंय?

समाजाबद्दल असा विचार करा
आपल्याला समाजात सर्व गोष्टीवर समानता असली पाहिजे, जेणेकरून समाजाची प्रगती होऊन सर्वत्र प्रेम, आनंद आणि शांती निर्माण होईल.
आपल्या समाजातील प्रत्येक माणसाची शारीरिक, मानसिक आणि आर्थिक प्रगती व्हावी असे वाटले पाहिजे, जेणेकरून आनंदाने भारलेला, आरोग्यदायी, समृध्द आपला समाज निर्माण होईल.
आपल्या समाजात महिलांची सुरक्षितता, आरोग्य आणि समृद्ध जीवन असले पाहिजे, जेणेकरून सर्व महिलांच्या मनात परस्परांविषयी प्रेमाची आणि आदराची भावना असली पाहिजे.
आपण आपल्या समाजात महिलांच विकासात प्रत्यक्ष योगदान पाहीले पाहिजे, जेणेकरून त्यात प्रेम, आनंद, शांतीसह स्वताःमधील सर्वोच्च शक्यता निर्माण करू शकतो.

 

आपल्याला जगात काय हवंय?

जगात मदतीचा हात देण्यासाठी विचार करा.
आपल्याकडे असं जग असले पाहिजे, ज्यात सर्वांसाठी सगळं काही भरपूर आहे, जेणेकरून सर्वजण प्रेमानं,आनंदानं आणि शांततेने जगू शकतात.
आपल्यात मनःशांती असली पाहिजे, जेणेकरून जगातील सर्व लोक आनंदानं अत्युच्च शिखरावर पोहचतील.
जगातील सर्व संकटं संपले पाहिजे जेणेकरून प्रेम, आनंद आणि शांतीचा प्रसार होऊन आणि पृथ्वीवर स्वर्ग निर्माण व्हावे.
जगातील प्रत्येक मनुष्याला उच्च ज्ञान, आणि पूर्णतत्वाची  ज्ञान मिळावे, जेणेकरून तो शांतीच्या शिखरा पर्यंत पोहोचेल.
अशा प्रकारे जीवनात आपल्याला काय हवंय प्रत्येक स्तरावर याचा विचार करायला पाहिजे. जगातील सर्व लोक जर काय नकोय याऐवजी काय हवंय या एकाच गोष्टींचा  विचार जास्त करतील,तर प्रत्येक कुटुंब, कार्यालय, समाज आणि प्रत्येक नात सारे जग उत्साहानं नवे जीवन जगतील.

Post a Comment

if you have any doubts, Please let me know

थोडे नवीन जरा जुने