कोरोना काळातल्या शाळेची पूर्वतयारी मुंबईतल्या काही शाळांनी सुरू केलीये. शाळेतले नवे बदल कसे आहेत ते पाहूया.
शाळेत जातील तेव्हा त्यांना सांभाळत प्रवेशद्वारावरच गर्दी करत पर्यंत पोहोचता येणार नाही कारण आता तुमच्या शाळेचे प्रवेशद्वार हे अस असणार आहे.
- सगळ्यात आधी गेटवर तुमचे तापमान मोजण्यात येईल.
- हाथ सानिटाईज केल्यानंतर, आत गेल्यावर फिजिकल डिस्टंसिंग साठी चौकोनी मार्किंग करण्यात आलं तेव्हा त्या मार्गाने तुम्हाला तुमच्या वर्गखोलीत जाता येईल.तुम्ही वर्गात जाल तेव्हा अगदी पंधरा ते वीस बेंचेस तुम्हाला दिसतील.
- विद्यार्थी संख्या दोन भागांमध्ये विभागली आहे.
वाचा: सर्दी, ताप आणि खोकला घरगुती उपचार: औषध गिलोय, संजिवनी वटी
जेव्हा विद्यार्थी वर्गात येतील.
- तेव्हा त्यांना आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत एकत्र बसता येणार नाहीये इतकच नाही तर आपल्या वर्ग मित्रांसोबत वर्गखोली सुद्धा त्यांना आता शेअर करता येणार नाहीये.
- शौचालयांमध्ये सगळे युरीनल होते त्यांना प्रत्येकी एक नंतर एक बंद केलेला आहे.
- शाळा सगळ्यांच्या बॉडी टेंपरेचर चेक करते.
- सेतू डाउनलोड अॅप डाउनलोड आहे की नाही ते चेक करतात.
- आता शाळेने इकडे सगळे सिंगल बेंचेस बंद ठेवलेला आहे. पहिल्यांदा आमच्याकडे डबल बंचेस होते.
फिजिकल डिस्टन्स पाळता येणे शक्य नसल्याने आता तुम्हाला मैदानावर कबड्डी बास्केटबॉल क्रिकेट असे कोणतेही खेळत सध्या खेळता येणार नाहीत. पण तुम्हाला कम्प्युटर रूम मध्ये जाता येईल कारण तिथे फिजिकल डिस्टंसिंग राखणं शक्य आहे.
शाळेत कुठेही यायचं असेल तर या चौकोनी मार्किंग्च्या मार्गाने जावं लागेल. तुम्ही आणि अगदी तुमच्या शिक्षकांनीही शाळेत कधीही न पाहिलेली आरोग्यव्यवस्था आता शाळांमध्ये करण्यात येत आहे.
शाळेत साधी प्राथमिक उपचार पेटीत असते आता तर शाळांनी विद्यार्थ्यांकरिता आपत्कालीन परिस्थितीसाठी विलगीकरण कक्ष ठेवलाय. इथे २-३ बेड उपलब्ध आहेत. वैद्यकीय सेवेसाठी नर्स ही उपलब्ध असेल.
मुलांमध्ये गेल्या चार-पाच महिनेे एवढी सेन्सिटिव्हिटी वाढलीय पेरेंट्स मध्ये पण मुलांमध्ये पण की त्यांना कुठल्या गोष्टी करू नयेत.
शाळेत पुस्तकांत पलीकडे मित्रमैत्रिणींशी गप्पा, त्यांच्या सोबत खेळत धमाल मस्ती करणं, एकमेकांचा डबा खाणं, संगीत, चित्रकला, हस्तकला अशा सर्व गोष्टी शिकणं हे सर्व काही आता नवीन शाळेत मात्र बदलणार आहे.
शाळा ची पूर्वतयारी शैक्षणिक वर्ष सुरू राहण्यासाठी होत असलेला एक मोठा प्रयत्न असला तरी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांच्या मनात संभ्रम कायम आहे.
वाचा: मुलांना त्यांच्या पालकांकडून पाहिजे असलेल्या 15 गोष्टी
लॉकडाऊन् नंतरचा शाळांसाठी ची अशी पूर्वतयारी काही मोजक्या खाजगी शाळा सुरू करू शकले आहेत. अजूनही मोठ्या संख्येनं छोट्या खाजगी शाळा आहेत. तसेच सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित शाळेत त्यांना अशा पद्धतीचे नियोजन करणं किंवा प्रत्यक्षात याची अंमलबजावणी करणं शक्य होत नाहीये. त्याचं कारण म्हणजे त्यासाठी लागणारा आर्थिक खर्च प्रत्येक शाळेकडे नाहीये त्यासाठी सरकार काही आर्थिक तरतूद करणार आहे का? किंवा त्यासाठीच काही नियोजन आहे का? ते सुद्धा शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलेले नाही आहे.

टिप्पणी पोस्ट करा
if you have any doubts, Please let me know