सौदर्य कसे जपाल? घरगुती उपायने चेहऱ्याची काळजी कशी घ्याल?

 सौदर्य जपा घरगुती उपायने - चेहऱ्याची काळजी

 

सौंदर्य ही देवी देणगी आहे. हे जरी सर्वांना माहिती असले तरी आपले रंग रूप नीटनेटके ठेवावे हे अगदी लहान मुलांपासून माहिती आहे.  आज आजीबाईनाही ठाऊक असते. सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते यात गैर काहीच नाही. पण सुंदर आणि सुंदर वाटणे यात सूक्ष्म फरक असतो.

 

सौदर्य कसे जपाल? घरगुती उपायने चेहऱ्याची काळजी कशी घ्याल?
 

 

मनाच्या अंतरंगात सौंदर्याची बीजं रूजली की तो बहर व्यक्तिमत्त्वात दिसून येतो. उत्तम सौंदर्य प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर दिसते. त्याच्या मनाच्या प्रसन्नतेत मुळे म्हणूनच देवाने चे रूप सशक्त अवयव दिले आहेत ते गोड राखून त्याची उत्तम देखभाल करणे आणि त्याला फुलवायचा प्रयत्न करणे ही सुंदरता प्रत्येकाने बाळगली पाहिजे.

सौंदर्याची कल्पना फक्त स्त्रियांच्या बाह्यरूपापूर्ति सीमित न राहता आता बुद्धिमत्ता, कार्यतत्परता, संभाषण, कौशल्य, कर्तव्यनिष्ठा, सौजन्य, उत्तम शिक्षण आणि करिअर अशा अनेक घटकांनी स्त्रीचे व्यक्तिमत्त्व बहरत चाललेले आहे. एका व्यक्तीत हे सर्व गुण नसतातच परंतु प्रयत्नपूर्वक मानसिक व शारीरिक निरोगी राहून वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात कौशल्य करणे हेच आजच्या आधुनिक नारीचे ब्रीद आहे. म्हणूनच खरे सौंदर्य हे उत्तम आरोग्यत आहे. स्त्री निरोगी तर पूर्ण कुटुंब निरोगी राहते कारण अशा स्त्रीकडे कुटुंबासाठी उत्तम आहार उत्तम वातावरण आणि घराची सुखद ऊब देण्याची क्षमता असते.

सौंदर्य काय आहे? सौंदर्य चेहऱ्यावर फक्त लेप लावला की आपली सौंदर्यता नाही दिसत. ब्युटी डोळ्यात, आवाजात, मनात असते ही एक नैसर्गिक असते त्याला ब्युटी म्हणतात. चेहऱ्यावर केमिकल पेक्षा नॅचरल गोष्टी म्हणजे जे निसर्गाने दिले ते लावावे.

 

काय आहे नॅचरल?

कोणतीही गोष्ट केमिकल त्वचेवर लावताना लक्ष दिले पाहिजे की त्वचेवर छिद्र असतात त्या छिद्रातून ते आपल्या शरीरात जातात आणि शरीरावर त्याचा परिणाम होतो. कारण केमिकल आपण खाऊ शकत नाही तर त्वचेवर पण नाही लावावे ते त्वचेच्या माध्यमातून ते आपल्या शरीरात प्रवेश करतात. केमिकल शरीरात जाऊन खूप नुकसान करतात. आणि खूप काही रोगाची उतप्ती होते. कोणतेही केमिकल वापरताना ते चागले आहे की नाही का आपल्या त्वचेसाठी शरीरासाठी योग्य आहे का ते पाहावे आणि त्याचा उपयोग करावा.

 

शरीर सौंदर्याचे मूल्यमापन कसे करायचे ?

  • प्रसन्न, हसतमुख चेहरा
  • सुडौल निरोगी बाधा, शरीर यष्टी
  • त्वचा, केस, दात, हात, पाय, डोळे हे निरोगी.
  • आत्मविश्वास जो व्यक्तिमत्वात दिसावा.
  • सौजन्यपूर्ण, माहितीपूर्ण, संभाषण कौशल्य.
  • स्वतःबद्दल अभिमान असणे पण गर्विष्ठपणा नाही.
  • द्वेष चिडचिड इत्यादींपासून दूर असणे.
  • जग हे सुंदर आहे व असावे हा विश्वास ठामपणे  असणे

 

सौंदर्य विषयक टिप्स

तेल हे शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे. तीळ, एरंडेल, मोहरी, खोबरेल अशा अनेक तेलामुळे शरीराला वेगवेगळे फायदे होतात. चेहऱ्याला हलकेच खोबऱ्याच्या शुद्ध तेलाने मॉलिश करावे नंतर एक दोन तास तसेच ठेवून साबणाने चेहरा धुवावा थंडीत हे विशेष उपयोगी ठरते.

आठवड्यातून एकदा अंघोळीपूर्वी शुद्ध एरंडेल तेलाने सर्वांगाला मालिश करावे. त्वचा निरोगी होते तिळाचे तेलही फायदे  देते. थंडीत मोहरीच्या तेलाचे मालिशचा उपयोग होतो.

ओठ फुटतात त्यावर व्हॅसलीन तूप लोणी लावावे. थंडीतही काळजी घ्यावी उन्हाळ्यातही उष्णतेमुळे ओठ सुकतात, फाटतात तेव्हा भरपूर पाणी प्यावे.

केस धुण्यासाठी कोमट पाणी वापरावे फार गरम, फार थंड पाणी वापरू नये.

शॉवरने किंवा तांब्या, मगने डायरेक्ट डोक्यावर पाण्याचा मारा करू नये. डावा पंजा पूर्णपणे डोक्यावर ठेवून मग पाणी ओतावे किंवा शॉवर घ्यावा. केस धुवन वाळवताना मऊ पंचा थोडावेळ बांधून ठेवावा. खसाखसा पुसून नये.
  केस वाळवताना अत्यंत कमी तापमान ठेवून ड्रायर सहा इंच वर केसांपासून धरावा. एकाच भागावर सारखे केंद्रित न करता फिरवत रहावे.

सुंदर त्वचा भाग्यवान लोकांना मिळते असे मानले जाते परंतु योग्य आहार व विहार यामुळे सतेज चमकदार त्वचा कोणालाही मिळू शकते.

ताजी फळे अननस, सफरचंद, द्राक्षे, संत्री, मोसंबी, कच्चा कोशिंबीर, मोडाची कडधान्ये, कोंड्या सकट कणीक व इतर पिठे खावी. त्वचेसाठी फळांचे भाज्यांचे ताजे रस सही फायदा देतात.

 

त्वचेचे चार प्रकार आहेत.

  1. सामान्य
  2. तेलकट
  3. कोरडी
  4. मिश्र त्वचा 

मुलायम, मऊ, एकसंघ व नितळ अशी सामान्यत्व च्या बाळाचे 5-7 वर्षापर्यंत मुलांची असते. त्यानंतर अनुवंशिकता, आहार खाणेपिणे, विहार यावर त्वचेचा पोत अवलंबून असतो. गरोदरपणात रजोनिवृत्तीच्या काळात वयात येताना हार्मोनल बदलांमुळे तेल ग्रंथी जास्त प्रमाणात तेल तयार करतात म्हणून त्वचेवर काळे डाग येण्याची शक्यता असते.

नाक, कपाळ, हनुवटीवर जास्त घाम येतो. त्वचा तेलकट असते.

पुटकुळ्या येण्याचे कारणे आपल्या खानपानाच्या सवयीवर अवलंबून असतात. अयोग्य आहार साखर, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ यांचे अतिसेवन यामुळे मुरमे वाढतात.

बद्धकोष्ठता, अपचन यामुळे शरीरातील विषारी टाकाऊ पदार्थ आतड्यातून पुन्हा रक्तात मिसळतात. ते पदार्थ बाहेर टाकण्यासाठी त्वचेला दुप्पट काम करावे लागते परिणामी मुरुमे येतात.

अशा वेळी योग्य आहार घेतला व काही फेसपॅक्स लावले तर निश्चितच फायदा होईल.

 

फेसपॅक्स लावण्यापूर्वी आणि काही पॅक्स...

प्रथम चेहरा गरम पाण्याने कपडा वापरून किंवा कॉटन पॅडसने शेकावा. म्हणजे छिद्रे मोकळी होतील नंतर गार पाण्याने किंवा कॉटनमध्ये बर्फाचा तुकडा ठेवून चेहरा साफ करावा.

किसलेली काकडी, दुधात शिजवलेले ओटस, शिजलेले गाजर, एकत्रित लेप करून लावावा.
संत्राच्या साली वाळवून पावडर करून चाळावी. त्यात लिंबू वाळवून त्या सालीची पावडर घालावी हा लेप रोज लावता येतो.

मुलतानी माती, गुलाब पाणी, चंदन पावडर एकत्र पेस्ट करून चेहर्‍यावर, गळ्यावर लावावी, पातळसर लेप दिला तर तडतडणार नाही. हलकेच चेहरा धुवावा.

काकडीचा कीस पिळून चेहऱ्यावर मानेवर लावावा हा ट्रान्सपरंट पॅक कधीही लावता येतो नंतर थंड पाण्याने धुवावे. पुटकुळ्या, काळे डाग, सुरकुत्या, कोरड्या त्वचेची समस्या दूर होते.

दही हे चेहरासाठी उत्तम टॉनिक आहे. चेहऱ्याला थंडावा देते. मुलायम निरोगी फील देते. वाटल्यास यात दोन ते तीन थेंब गुलाबपाणी किंवा गुलाब पाणी पाकळ्या कुस्करून घालावी.

चंदन तेलात मोहरीचे तेल घालून चेहर्‍यावर लावा मुरमे कमी होतात.

 


घरगुती फेशियल टिप्स

झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांची पेस्ट करून त्यामध्ये थोडसं मध कच्चा दूध मिक्स करून चेहऱ्यावर लावणे. अर्धा तास फेस पॅक ठेऊन कोमट पाण्याने धुवावे. चेहऱ्यावर चमक येईल.

कोरड्या त्वचेसाठी एलोविरा जेल मध्ये टरबुजचा रस, गुलाब पाणी, मध मिक्स करून चेहऱ्यावर लावणे अर्धा तास लाऊन झोपावे चेहऱ्याला थंडावा मिळतो आणि चेहरा चमकतो.

तेलकट त्वचेसाठी मुलतानी माती मध्ये पिकले ला पपईचा पल्प मिक्स करून चेहऱ्यावर मास्क लावा. चेहऱ्यावरचा तेलकट पणा जाईल.

 

चेहऱ्यावरील थकवा जाण्यासाठी फेस पॅक.

बादाम पावडर मध्ये थोडे मध आणि लिबू रस मिक्स करून चेहऱ्यावर लेप लावताना पातळ लावणे. चेहऱ्यावर एनर्जी दिसेन आणि  रुक्ष त्वचा छान टवटवीत होईल.

 

चेहऱ्यावर थंडावासाठी फेस पॅक.

काकडी,टरबुज आणि चंदनचे पेस्ट करून चेहऱ्यावर लावणे. १५ मिनिट लावून धुवावे. चेहऱ्यावर गुलाब जल लावल्याने थंडावा मिळेल.

 

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी.

बेसन, हळद, कच्चे दूध चे पेस्ट करून चेहऱ्यावर लेप लावावा.

 

सकाळी चेहरा धुतल्यावर चेहरा फ्रेश दिसण्यासाठी.

एलोविराचा ताजा  गर खावे आणि गर चेहऱ्याला लावावे आणि संध्याकाळी घरी आल्यावर चेहऱ्यावर गुलाबपाणी लावल्याने फायदा होईल. बाहेर प्रवास करत असाल तर थोडे वेळाने चेहऱ्यावर पाणी शिपडावे.

चेहरा चांगला ठेवण्यासाठी मसाले, लोणचे, चहा, काफी, अल्कोहोल,स्मोकिंग करणे टाळावे.

खूप ऊन असेल तर बाहेर जाताना त्वचा झाकून जावे. उन्हाळात जास्त पाणी, शरबत, ताक प्यावे. त्वचेला थंडावा मिळेल अशी पेय घ्यावे यामुळे त्वचा स्वस्थ राहील.

 

आयुर्वेद मध्ये नॅचरल पंचकर्म, शुद्धीकरण आणि शिरोधारा ब्युटीसाठी उत्तम.

शरीरामध्ये टॉक्सिंस म्हणजे विष्टा जमा असेल तर आपल्या चेहऱ्यावर प्रभाव पडतो काळेेवर्तुळ, काखेत काळे डाग, पीपल्स अशा गोष्टी शरीरावर होणे हे कुठेतरी टॉक्सिंस जमा असल्यामुळे असा परिणाम त्वचेवर होतो. आयुर्वेद, पंचकर्म आणि शुध्दीकरण हा पर्मनंट सोलुशन आहे शरीरातील टॉक्सिंस बाहेर काढू शकतो. शरीर चांगले राहते. शुध्दीकरण केल्याने त्वचेवरील डाग, पीपल्स मध्ये चांगला लाभ मिळतो.

स्वयंपाक घरातील मसाले ब्युटीसाठी उपयुक्त आहे.

हळद चे खूप गुणधर्म आहे. उटण बनुन त्वचेवर लावल्याने चेहरा ग्लो दिसतो. तसेच  त्वचेवर काही किटाणू असल्यास किवा इन्फेक्शन असल्यास हळद लावल्यास नष्ट होतील.

काकडी चा ज्युस काढून तो रस त्वचेवर मसाज करा त्यामुळे चेहऱ्यावर चमक येईल.

पीपल्स असल्यास धने ची पेस्ट करून चेहऱ्यावर लेप लावावा त्याने खूप फायदा होईल.

केसांची ब्युटी वाढवण्यासाठी दही ने केस धुवावे.

 

फळानपासून ब्युटी टिप्स...

त्वचेवर छिद्र असतात.  त्या छिद्रातून जे आत जातात त्याचा परिणाम होऊ लागतो आणि त्वचेला सुंदर बनवतात.

ग्लो वाढवण्यासाठी केळ आणि सफरचंदची पेस्ट करून चेहऱ्यावर लावावी. मास्क सारखे लावावे. चेहऱ्यावर काळे डाग, खड्डे असेल तर संत्रीची साले चोळावी डागावर.



भाजीनी पण आपण सौंदर्य छान ठेऊ शकतो.

गाजर, पालक आणि आवळा चे ज्युस करून प्यावे.


जडीबुटी मध्ये कडूनिबाची पाने  त्वचेसाठी खूप गुणकारी आहे. पीपल्स,डेंड्रफ होत असेल तर कडूनिब चांगले आहे.


हळद पण त्वचेसाठी गुणकारी आहे.


सौंदर्य टिकवण्यासाठी मंजिष्ठा पण काही वेळा उपयोग केला जातो.


काकडी, केशर चे उटण हे जडीबुटी पण आहे आणि सौंदर्यसाठी चांगले आहे.

 

नॅचरल ब्युटीसाठी काय करावे ?

सुरकुत्या असेल तर एरंड तेल किंवा टोमॅटोचा ज्यूस ने मसाज चेहऱ्यावर करावे.

काळे खडे घालवण्यासाठी आणि चमक येण्यासाठी कच्चे दुध कॉटन ने चेहऱ्यावर  मसाज करावे.

चेहऱ्यावर ग्लो साठी बदाम पावडर कच्चे दुध थोडे आणि मध मिक्स करून लावावे. 15 मिनिट लावून सुखल्यावर धुवावे. खुप सुंदर चेहरा दिसेल तुम्हाला.

डाग सर्कल असेल चेहऱ्यावर तर बदाम तेल ने जेंटल मसाज करणे.

कोरडी त्वचा असेल तर नारळ तेल मध्ये मध थोडे मिक्स करून लावावे. चेहराची त्वचा मऊ मुलायम होईल.

 

दररोज सुंदर दिसावे यासाठी काय करावे?

दररोज आपण वेळेवर खाणे, पिणे आणि पोट साफ होणे ही दिनचर्या व्यवस्थित असेल तर शरीर आणि त्वचा ही चागले राहील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मन आणि डोके शांत असेल तर आपण सुंदर दिसू. आत्मा मध्ये खरी सुदंरता असते.सत्यते मध्ये सुदंरता दिसून येते. 




Post a Comment

if you have any doubts, Please let me know

थोडे नवीन जरा जुने