औषधी फळ व भाजीचे फायदे

 फळ व भाजी - औषधी वनस्पती

 

एकेका औषधी वनस्पती वर आपल्या पूर्वजांनी हजारो-लाखो व करोड वर्षापर्यंत सतत संशोधन केले अशाच काही औषधी वनस्पती याचा प्रयोग परमपूज्य स्वामी रामदेव जी महाराज आणि श्रद्धेय आचार्य बालकृष्ण जी नि लाखो-करोडो रोगांवर केला व त्या सर्वांसाठी लाभदायक आहे असे आढळले. योग साधक आपल्या मेंदूला टवटवीत ठेवू शकतात .

 

औषधी फळ व भाजीचे फायदे


रोगनिवारक दुधी भोपळा

दुधी भोपळ्यात श्रेष्ठ प्रकारचे पोटॅशियम भरपूर प्रमाणात आढळते. त्यामुळे तो मूत्रपिंडाच्या रोगात अत्यंत उपयोगी आहे. याच्या सेवनाने लघवी व्यवस्थित होते आणि अल्सर मध्येही लाभदायक आहे.



उच्चरक्तदाब मध्ये लाभदायक डाळिंब

आपण नेहमी बघितले आहे की हिमोग्लोबिन कमी झाल्यावर डाळिंबाचे सेवन अत्यंत लाभदायक आहे. याचा एक गुण हा पण आहे की हे उच्च रक्तदाबाला नियंत्रित करते दररोज डाळिंबाचा रस प्यायल्याने हृदय स्वस्थ राहते



शारीरिक दुर्बलतेमुळे चमत्कारी औषध अंजीर

एका अंजीर बरोबर एक लहान चमचा बडीशेप चावून चावून खाल्ल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते अशक्त व्यक्तीने हा प्रयोग चाळीस-पंचेचाळीस दिवसापर्यंत नियमितपणे करायला पाहिजे



दूध एक संपूर्ण आहार

दूध एक संपूर्ण आहार आहे यात सर्व आवश्यक पोषक तत्व असतात यात कॅल्शियम बरोबर लॅक्‍टिक अॅसिड असते ज्यामुळे आपली त्वचा मऊ राहते



कोलेस्ट्रॉल कमी करते सफरचंद

सफरचंदात एक खास प्रकारचे विद्राव्य फायबर आढळते जे कोलेस्ट्रॉला कमी करते त्याचबरोबर सफरचंदाच्या नियमित प्रयोगाने हदय स्वस्थ होते.



ब्लड प्रेशर नियंत्रित करते लसुन

सकाळी सकाळी उपाशीपोटी लसुन ची एक कळी सोलून साध्या पाण्याबरोबर घेतल्यास ती उच्च रक्तदाबाला नियंत्रित करते ही हदय संबंधी समस्या पासून वाचवण्या बरोबर लिव्हर ला ही स्वस्थ ठेवते.



तांदुळाचे औषधी गुण

जगभरात मोठ्या संख्येत लोकांचे मुख्य अन्न तांदूळ आहे   तांदूळमध्ये कार्बोहाइड्रेटसबरोबर झिंकही असते जे शरीराला फिट ठरते तांदूळ दूध व गोड मिसळून खाल्ल्याने पोट साफ होते.



स्मरणशक्ती वाढवतात भाज्या

वारंवार विसरण्याची समस्या अत्यंत त्रास देणारी असते काही भाज्या जसे कांदा बीट आणि वांग्याच्या सेवनाने स्मरणशक्ती वाढते दररोज अक्रोडच्या सेवनाने ही समस्या दूर होते.



गाठींमध्ये करा मधाचा वापर

दालचिनी वाटून चूर्ण बनवून घ्यावे एक चतुर्थांश चमचा चूर्णात एक चमचा मध मिसळून दररोज सकाळ सायंकाळ घेतल्यास गाठीमध्ये आराम मिळतो.



बहुमूत्रता दूर करते खारीक

एक ग्लास दुधात दोन खारीक टाकून उकळून घ्यावे त्यानंतर बी काढून खारीक खाऊन वरून दूध प्यावे. हा प्रयोग रात्री झोपताना केल्यास बहुमुत्रा रोग दूर होतो.



नेत्र रोगात लाभदायक कडुनिंब

कडुनिंबाच्या पानांना वाटून लगदा पेस्ट बनवून घ्यावा. डोळे बंद करून पापण्यांवर हा लगदा ठेऊन पट्टी बांधावी. हा प्रयोग दररोज अर्धा ते एक तास केल्यास लाभ होतो.



रोग प्रतिरोधक क्षमता वाढवतो पडवळ

पडवळात अनेक प्रकारची पोषक तत्वे आढळतात. जी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. हा शरीराची रोग प्रतिरोधक क्षमता वाढवतो आणि याच्या सेवनाने पोटाची सूज दूर होते काविळीत पडवळ खायला पाहिजे.



लिंबू आहे कॅन्सरमध्ये लाभदायक

लिंबू शरीरात असलेल्या फ्री रॅडिकल्सशी लढून कॅन्सरला नष्ट करते आणि अॅटी ऑक्सीडेंटच्या रूपातही काम करते म्हणून दररोज आपल्या भोजनात लिंबाचा अवश्य सामील करावे.



हाडांसाठी लाभदायक फणस

फणसात लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, विटामिन्स, व मिनरल्स भरपूर प्रमाणात आढळतात. हा रक्तल्पतेला दूर करण्याबरोबर हाडांना मजबुती प्रदान करतो. फणस उच्च रक्तदाबात ही लाभदायक आहे.



सांधेदुखी त लाभदायक घटक

100 मिली मोहरीच्या तेलात थोडासा हिंग पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा सेंधव मीठ मिसळून चांगल्याप्रकारे गरम करावे आणि थंड झाल्यावर गाळून बाटलीत भरावे. दररोज दिवसातून दोन वेळा या तेलाचे सांध्याची मालिश केल्यास वेदना बरी होते.



पोटाच्या रोगांमध्ये गुणकारी पुदिना

पुदिना पाण्यात वाटून त्यात भाजलेले जिरे, लिंबू आणि मीठ मिसळून प्यायल्यास जुलाब, पोटात मुरडा मारणे, आंबट ढेकर इत्यादीत लाभ होतो.

Post a Comment

if you have any doubts, Please let me know

थोडे नवीन जरा जुने