सिनेमागृह चा पडदा आज उघडणार.

दिवाळीच्या मुहूर्तावर बॉलीवूड मध्ये पुन्हा एकदा नवंचैतन्य निर्माण होणार आहे. कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी  चित्रपट गृहात लागलेले टाळे आता उघडणार आहे.

 

सिनेमागृह
 

 
त्याच बरोबर मल्टिप्लेक्स, नाट्यगृह, जलतरण तलाव आणि योग्यशाळाही अटी आणि नियम नुसार उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. गेल्या सात महिन्यांपासून सिनेमागृह, नाट्यगृह बंद असल्याने आर्थिक नुकसान झाले. दिवाळीच्या निमित्ताने सिनेमागृह, नाट्यगृहे सुरू करण्याची परवानगी दिली आहे तशी मागणी निर्माते आणि कलाकारांनी केली आहे. या गोष्टीवरून 50% आसन क्षमतेसह सिनेमागृह सुरू केले जाणार असून मात्र आतमध्ये खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास परवानगी नाही असे राज्य सरकारने सागितले आहे.

सप्टेंबर मध्ये केंद्र सरकारने सिनेमागृहे आणि नाट्यगृहे चालू करण्याची परवानगी दिली होती पण राज्यातील सिनेमागृह या बाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता. शेवटी राज्य सरकारने राज्यातील सिनेमागृहे गुरुवार पासून चालू करण्याची परवानगी दिली आहे. सिनेमागृहासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने जी मार्गदर्शक तत्त्वे सागितली ती केली आहे. ती या सेवेसाठी लागू असते त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे अशी सूचना सरकारकडून देण्यात आली आहे.

इनडोअर खेळांनाही परवानगी

कंटेन्मेट जॉनच्या बाहेर जलतरण तलाव चालू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र जलतरण तलाव खेळाडूंसाठी वापरण्याची ही अट केली आहे. कोरोना संसर्गाच्या काळात सर्व नियमाचे पालन करावे तसेच करना कडेही लक्ष द्यावे अशा सूचना सरकारने केल्या आहेत तसेच टेबल टेनिस बॅडमिंटन, स्क्वॅश आदी इनडोअर खेळांनाही अटी-शर्ती सहज परवानगी दिली आहे.

"सगळे नियम पाळून चित्रपटगृहे सुरू करीत आहोत आता अधिका-अधिक प्रेक्षकांनी चित्रपटगृहात येऊन चित्रपट पाहावेत.
नितीन दातार, सिनेमा ओनर्स असोसिएशन ऑफ इंडिया


"चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी दिल्यामुळे पडद्यामागे कामे करणाऱ्या अनेक लोकांना कामे मिळतील यापुढे सगळ्या चांगल्या गोष्टी होणार आहेत अशी नवी आशा निर्माण झाली आहे.
जयवंत वाडकर,अभिनेते

"सरकारने घेतलेला निर्णय चांगला आहे मात्र पुढील सहा महिने सरकारने नाट्यगृहाचे भाडे आकारून नये.
अमेय खोपकर, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष आणि निर्माते.


"सरकारने चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या मार्गदर्शन सूचना वर सगळ्यांना ते संघटना एकत्रित विचार नियम करून पुढील दिशा ठरवू.
प्रसाद कांबळी, मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष

"नाट्यगृहाची स्वच्छता अर्थात सॅनिटायझर रेशन वगैरे झाल्याशिवाय नाट्यगृहे उघडता कामा नयेत. तसेच, सरकारने नाट्यगृहाचे भाडे अत्यल्प करून द्यावे, जाहिरातीचे दर कमी करून द्यावेत, जेणेकरून निर्मात्याचा खर्च कमी होईल.
पुष्कर श्रोत्री, अभिनेता

Post a Comment

if you have any doubts, Please let me know

थोडे नवीन जरा जुने