GDP म्हणजे काय? तो कशासाठी मोजला जातो? आणि कसा मोजला जातो? याची सविस्तर माहिती

देशाचे GDP खाली घसरला आहे, अस साध्या आपल्याला गोष्टी कानावर पडत आहेत, मग हे GDP चे आकडे नक्की काय बोलत असतात आपलीशी या बद्दल आपण समजून घेऊ.

 

GDP म्हणजे काय? तो कशासाठी मोजला जातो? आणि कसा मोजला जातो? याची सविस्तर माहिती

 

शाळा वर्षातून चार वेळा प्रगतीपुस्तक पाठवायचे पहिल्या युनिट टेस्ट नंतर सहा महिन्या नंतर दुसऱ्या घटक चाचणी नंतर आणि मग चौथ्यांदा वार्षिक परीक्षा नंतर निकाल लागायचा वर्षभरामध्ये काय बरी वाईट कामगिरी केलेत हे या प्रगती पुस्तकावर समजायचं. अगदी हेच आकडे देशाचे जीडीपी कामगिरी करत असतात.


Central statistic office म्हणजे केंद्रीय सांखिक संस्था वर्षातून चार वेळा देशाचा जीडीपी मोजते.

 

GDP म्हणजे काय? तो कशासाठी मोजला जातो?


जीडीपी म्हणजे Gross Domestic Product मराठीत याला म्हणतात सकल राष्ट्रीय उत्पन्न. 

 

थोडक्यात सांगायचं तर एका देशांमध्ये ठराविक कालावधी मधे तयार झालेल्या वस्तू आणि सेवा यांच्या उत्पादनाचा खर्च.

एक उदाहरणं पाहूया एका देशाने एका वर्षात फक्त १० मोबाईल तयार करत असेल आणि त्या मोबाईलची किंमत आहे १००० रुपये असेल तर एका वर्षात या देशाने तयार केलेले एकूण मोबाईलची किंमत म्हणजेच GDP. त्या देशाचा त्या वर्षाचा जेडीपी होईल दहा गुणिले 1000 रुपये एकूण 10,000 GDP होईल.

ठराविक काळामध्ये देशात जे काही तयार होतय, विकलं जातंय, विकत घेतले जाते किंवा देवाण-घेवाण होते अशा सगळ्यांचा मिळून तयार GDP होतो.

 

GDP चा इतिहास

1935 वर्षी अमेरिकेमध्ये अर्थतज्ञ सायमन कुझनेट्स त्यांनी पहिल्यांदा अमेरिकेचा काढला होता. काही वर्षांमध्ये जगातल्या सगळ्या देशांनी ही पद्धत स्वीकारली. भारतामध्ये देखील 1950 पासून अर्थव्यवस्थेत GDP काढला जातोय.

 

GDP कसा ठरवतात?

चार महत्त्वाच्या घटनांवर हा GDP ठरवला जातो

  1. याचा पहिला महत्त्वाचा घटक आहे. Consumption Expenditure तो म्हणजे लोकांनी वस्तू आणि सेवा या विकत घेण्यासाठी केलेला एकूण खर्च.
  2. दुसरा घटक आहे Government Expenditure - गव्हर्मेंट एक्‍सपेंडिचर म्हणजे सरकारने केलेल्या एकूण खर्च
  3. तिसरा हा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे Investment Expenditure - गुंतवणूक केली जाते.
  4. चौथा महत्त्वाचा घटक म्हणजे Net Export (निर्यात वजा आयात) झालेली एकूण निर्यात त्यातून वजा केली जाते एकूण आयात. असा मिळतो आपल्याला नेट एक्सपोर्ट.


GDP हा नॉमिनल आणि रियल अशा दोन प्रकारांनी मोजला जातो. नॉमिनल GDP म्हणजे वस्तू आणि सेवांच्या आत्ताच्या काळातले किमती.

जेव्हा एखादं पूर्वीच वर्ष आधारभूत धरून, पाया धरून त्यानुसार मोजल्या जातात त्यामध्ये महागाईचा विचार केला जातो त्यावेळी मिळतो तो रिअल GDP. या GDP आपा ला आपण वृध्दी चा दर किव्हा Growth Rate असाही म्हणतात. सध्या भारतामध्ये  GDP कॅल्क्युलेट करायला आर्थिक वर्ष 2011 2012 हे आधार धरले जाते.

हेच आपण उदाहरणाने समजून घेऊ, समजा 2011साली ३ वस्तूचे उत्पादन झाले, प्रत्येकी किंमत होती शंभर रुपये म्हणूनच त्या वर्षीचे GDP झाला 300. 2012 मध्ये घटून २ वस्तूचे उत्पादन झाले. महागाईत्याची प्रत्येकी किंमत दीडशे रुपये झाले, म्हणजेच पुरवठा कमी झाल्याने वस्तूची किंमत वाढली. त्यामुळे यावर्षी पण ३०० झाला. या परिस्थती मध्ये २०१२ ची तुलना २०११ करायची आहे. 2011 मध्ये ती वस्तू 100 रुपये होती म्हणजे 200 GDP

याचाच अर्थ असा होतो की 2011 आणि 2012 तुलना केल्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की जीडीपी घटलेला आहे.


या GDP साठी आकडेवारी वेगवेगळ्या क्षेत्रां मधून गोळा केली जाते. आपण पाहुयात ती क्षेत्र कोणती आहे.

 

GDP आकडेवारीसाठी क्षेत्र

  • कृषी क्षेत्र
  • खान उद्योग 
  • उत्पादन क्षेत्र
  • वीज क्षेत्र
  • बांधकाम क्षेत्र
  • व्यापार
  • संरक्षण
  • आणि इतर सेवा

सगळ्या सेवांमध्ये आकडेवारी मोजून GDP ठरवला जातो. GDP काढण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आकडेवारी गोळा केली जात असली तरी देखील हा GDP सर्वसमावेशक नाही असे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे. प्राध्यापक अरुण कुमार, अर्थतज्ञ यांच्या म्हणन्यात
   

"देशाचा 94 टक्के रोजगार असंघटित क्षेत्रात निर्माण होतो त्याचा समावेश जीडीपीमध्ये होत नाही. जर जिडीपी नकारात्मक झाला तरी याचा अर्थ आहे असंघटित क्षेत्राची कामगिरी संघटित क्षेत्राच्या तुलनेत आणखी खराब असणार."

सामान्यांसाठी GDP महत्त्वाचा का ?

कारण यामुळे सरकार आणि जनतेला अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यायला मदत होते. GDP मध्ये वाढ होत असेल तर देशाची अर्थव्यवस्था सुरळीत चालू आहे सरकारचे योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचत आहेत याचा अर्थ होतो.

कर्ज डीपीचा दर घसरला तर सरकारला अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी आपल्या धोरणांमध्ये अधिक काम करायची गरज आहे असा याचा अर्थ होतो.

देशाची अर्थव्यवस्था 5 त्रिल्लियन डॉलार करायचा आपले स्वप्न असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं पण यासोबतच गेल्या काही काळामध्ये अनेक अर्थतज्ञ यांनी GDP आकडेवारी वर शंका उपस्थित केली होती.

बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी देखील काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की भारताचा जीडीपी ही निगेटिव्ह असू शकते.

 

 

 

Post a Comment

if you have any doubts, Please let me know

थोडे नवीन जरा जुने