लग्नानंतरचं पहिलं वर्ष किंवा प्रेमाचा बहर फुलवून आल्यानंतरचा सुरुवातीचा काळ हा प्रत्येक जोडप्यांसाठी काही वेगळाच आनंद देणारा व खास असतो.लग्नानंतर किंवा प्रेमाची गाठ बांधल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक पहिल्या सणाला या भावना व मजा आणखीच वाढत जाते.असं यासाठी होतं कारण बायकोच्या रुपाने आपल्या कुटुंबात एक नवीन व्यक्तीचे आगमन झालेलं असतं व सणाचा आनंद साजरा करण्यात मुलींना जास्त रस असतो.तिच्या येण्याने वातावरण घर-संसार काही उल्हास मय झालेलं असतं.
घरातील व आयुष्यातील आनंद द्विगुणित करणाऱ्या अशा या नव्या परीला किंवा प्रियसीला आनंदाने दोन शब्द देणे प्रत्येक नवऱ्याचं कर्तव्य असतं.
तिचा दिवस का आनंदाने भरू नये? पण बऱ्याचदा मुलांना हेच समजत नाही की कोणता गिफ्ट दिल्याने बायको किंवा प्रियसी खुश होईल किंवा तिला जास्त गरज कोणत्या वस्तूची आहे हेच समजायला मार्ग नसतो.
पण मित्रांनो जेव्हा आपल्याला माहीत नसतं की बायकोला कोणत्या वस्तूंची गरज आहे तेव्हा फसवी युक्ती करण्यापेक्षा खाली दिल्याप्रमाणे न्यूट्रल गिफ्टस द्यावे जे ती कधीही वापरू शकते व ते पाहून तिला आनंद ही होऊ शकतो.
चला तर जाणून घेऊया त्या खास गिफ्ट बाबत जी तुमच्या नात्याची दिवाळी अजून प्रकाश मय करेल.
ब्युटी बॉक्स
तुम्हाला ब्युटी मार्केट पासून ऑनलाइन प्लॅटफॉर्म पर्यंत ब्युटी बॉक्स कुठेही अगदी सहजपणे मिळू शकतो.
याची खरेदी करण्याआधी गप्पांच्या ओघात हे नक्की जाणून घ्या की कोणत्या खास एलिमेंट्स प्रोडक्ट ची एलर्जी तर नाही ना?
उत्तम तर हेच आहे की तुमची बायको आधीपासून वापरत असलेल्या ब्युटी बॉक्स तिला द्या. कारण याची तिच्या त्वचेला सवय झालेली असेल व ॲलर्जी ही होणार नाही.यासाठी तुम्ही एखाद्या तिच्या जवळच्या मैत्रिणीचा सल्लाही घेऊ शकता यामुळे सरप्राईज ची मजा कायम राहील.
ट्रेडी दागिने
भारी भक्कम वजनाचे दागिने तर मुली लग्न सोहळ्यातही घालतात पण सध्या ट्रेड सुरू आहे तो लाईट वेट ज्वेलरीचा.
कोणत्या ट्रॅडिशनल सेट च्या जागी या वर्षीच्या दिवाळीत तुम्ही आपल्या बायकोला किंवा प्रियसीला एखादं नाजुकसे ब्रेसलेट, डायमंड ड्रॉप, ईयर रिंग्स, सन साईन किंवा मून साईन असलेली चैन किंवा एखादं सुंदर स नाजूकसा पैंजण देऊ शकता.
खरतर आजकाल सिल्वर ज्वेलर्स नाही ट्रेड सुरू आहे.जर तुमच्या बायकोला असं काही पसंत असेल तर तेच घ्या कारण अशी ज्वेलरी पारंपारिक व पाश्चिमात्य अशा दोन्ही ड्रेसवर त्या वापरू शकतात. त्यामुळे तुम्हाला आधी तिचा इंट्रेस्ट तपासून पाहणे गरजेचे आहे.
कस्टमाइज्ड वॉच
आज-काल मुलींच्या घड्याळ यामध्येही खूपच वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत.मुलींना स्टाइलिस्ट घड्याळात सही वेळ असतो त्यामुळे हा एक चांगला पर्याय होऊ शकतो.पत्नीच्या हातात पहिल्यापासून कोणत्या कंपनीचे घड्याळ आहे हे पाहून तुम्ही त्याच कंपनीच्या नवीन डिझाईन पासून करू शकता.
तुम्ही त्याला कस्टमाइज्ड देखील करू शकता. असे कित्येक ब्रांड आहे जे ही सुविधा आपल्या ग्राहकांना देतात. पर्सनलाइज्ड वॉच हादेखील एक पर्याय तुमच्या समोर आहे. आता हे तुम्हालाच ठरवावं लागेल की कोणतं गिफ्ट तिला जास्त आवडेल.
ड्रेस की साडी
इथे आम्ही डायमंड वर्क असलेली जड साडी किंवा ड्रेस याबद्दल बोलत नाही कारण अशा साड्या तर तिने लग्नावेळी खरेदी केल्या असतील आणि प्रेयसी असेल तर लग्नाआधी ती अशा हेवी वर्क असलेल्या साड्या घालून तर फिरू नाही शकत ना तुम्ही दिलेली साडी किंवा ड्रेस ती नेहमीच्या आयुष्यात वापरावं असं वाटत असेल तर ट्रेड मध्ये असलेल्या साड्या आणि एकदम हलक्याफुलक्या गिफ्ट म्हणून द्या.
या साड्या सावरायला सोप्या आणि दिसायला मॉर्डन असतात.त्यामुळे या साड्या त्या छोट्याशा फॅमिली कार्यक्रमाला किंवा ऑफिसमध्ये जाताना नेसू शकतात. जर तुम्हाला थंडीच्या ऋतूनुसार साडी ड्रेस गिफ्ट करायचं असेल तर वेलवेट हा सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. आज-काल हे फायब्रिक जास्त ट्रेड मध्येही आहे.
परफ्युम
गजराऱ्या असो वा परफ्युमचा सुगंधासाठी मुली कायमच वेड्या असतात. त्यांना विविध सुगंधाचे परफ्युम वापरायला आवडतं.ज्वेलरी चा किंवा मेकअप च्या विविध वस्तू आपल्याकडे कलेक्शन असावं हे जसं मुलींना वाटतं अगदी तसेच त्यांना विविध परफ्युमटे सेट आपल्याकडे असावा असंही वाटतं.
त्यामुळेच तिचे आयुष्य सुगंधाने व्यापून टाकण्यासाठी तिला एखाद्या छानशा चहुबाजूने दरवळणाऱ्या परफ्युमचा सेट किंवा सिंगल परफ्यूम ची बॉटल गिफ्ट करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा
if you have any doubts, Please let me know