कोजागिरी पौर्णिमा महालक्ष्मी देवीचे पूजन धनलाभाचे शुभयोग, शुभाशिर्वाद.

चातुर्मासात अनेक विविध प्रकारची व्रत सण उत्सव साजरे केले जातात. चातुर्मासातील अश्विन महिन्यात नवरात्र 'विजयादशमी' म्हणजे दसरा नंतर येणारी अश्विन पौर्णिमा ही महालक्ष्मी देवीचे पूजन केले जाते. अशी प्राचीन परंपरा आपल्याकडे असल्याचे दिसून येते. वर्षभरात येणाऱ्या पोर्णिमा पैकी अश्विन पौर्णिमा ही  विशेष महत्त्व मानले जाते. 

 

महालक्ष्मी देवी

 

कोजागिरी पौर्णिमा ही शरद ऋतूत येते म्हणुन याला शरद पौर्णिमा असे म्हणतात. आणि या दिवशी जागरण केले जाते आणि लक्ष्मी देवीचे पूजन करण्याची प्रथामुळे याला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हटले जाते. काही भागात याला नवान्न पौर्णिमा असे म्हणतात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्र आपल्या संपूर्ण सोहळा कलांमध्ये दिसतो. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि त्यामुळे  चंद्र मोठा दिसतो. चंद्राच्या या गुणामुळे नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे असे भगवान श्रीकृष्णाने श्रीभगवतगीता मध्ये लिहिले आहे. कोजागिरी म्हणजे शरद पौर्णिमा कधी असते? महत्त्व, मान्यता, परंपरा आणि काही गोष्टी आपण जाणून घेऊया...


लक्ष्मी देवीचा जन्म

कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाला विशेष महत्त्व दिले जाते. शेतकरी वर्गांमध्ये हा दिवस उत्साहाने साजरा करतात. निसर्गा बद्दल कृतज्ञता वाटणाऱ्या शेतकऱ्यांना कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची परंपरा आहे.
या पौर्णिमेला घराघरात नवीन धान्य आलेले असते.भात,नाचणी, वरी दाळे आदी प्रकारच्या धान्याची पूजा करण्याचा दिवस असतो. म्हणजेच नवान्न पौर्णिमा असे म्हणतात. काही अशा मान्यतांनुसार आश्विन पौर्णिमेला महालक्ष्मी देवीचा जन्म झाला आणि समुद्रमंथनाच्या दिवशी लक्ष्मी देवी भूतलावर प्रकट झाली असे म्हंटले जाते.

कोजागिरी पौर्णिमा

सन 2020 मध्ये शुक्रवार, 30 ऑक्टोबर रोजी अश्विन पौर्णिमा या कोजागिरीला लक्ष्मी चंद्र मंडळातून भूतलावर उतरून को जागर्ती?असा प्रश्न विचारते असे म्हटले जाते. म्हणून या पौर्णिमेला कोजागिरी असे म्हणतात. या दिवशी मसाला दूध पिणे याचे ही शास्त्रीय कारण आहे. शरद ऋतूमध्ये मसाला दूध आरोग्या साठी उपयुक्त असते, असे आयुर्वेदात लिहिले आहे. त्यामुळे कोजागिरीच्या दिवशी मसाला दूध पिण्याची प्रथा आहे. आणि या दिवशी चंद्र 

 

मसाला दूध


पृथ्वीच्या सर्वात जवळ म्हणजे कोजगिरी पर्वताच्या लगत आलेला असतो. म्हणून या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. अशी मान्यता या पौर्णिमेला माणिकेथारी (मोती तयार करणारी) असेही म्हंटले जाते.

लक्ष्मी देवीची पूजा

भारतातील बहुतांश भागात शरद पौर्णिमेला लक्ष्मीनारायणाचे पूजन करण्याची प्रथा आहे. या दिवशी देवी नारायणांसह गरुडावर प्रस्थापित होऊन पृथ्वीतलावर येते. लक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी अनेक देवता स्वर्गातून पृथ्वी तलावर येतात, अशी लोकांची मान्यता असल्याचे म्हटले जाते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध उकळून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखवला जातो आणि दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडली कि, मग ते दूध घेतले जाते. या दिवशी उत्तररात्रीपर्यंत जागरण करण्याची प्रथा आहे. प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची आश्विनी साजरी करतात.

लक्ष्मी देवीचे शुभ आशिर्वाद

कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीदेवीची पूजा करून जागरण केले कि लक्ष्मी देवीचे शुभ आशिर्वाद प्राप्त होते असे म्हणतात. ज्या घरातील व्यक्ती जागरण करत नाही त्यांच्या दारातुन लक्ष्मी देवी परत जाते. कोजागिरीला केलेली लक्ष्मीपूजा विशेष मानले जाते. यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल चागंली होते. लक्ष्मीदेवीच्या आशीर्वादामुळे धन, धान्य, वैभव, ऐश्वर्य प्राप्त होते, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी श्रीसूक्त, कनकधारा स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम,आधीचे पठण केल्याने शुभ मानले जाते. दमा किंवा अस्थमा यासारख्या अनेक आजारांवरील औषधे खिरीमध्ये मिसळून ते  कोजागिरीच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवतात आणि  चंद्राचे किरण या खिरीवर पडल्यास त्याचा गुणधर्म बदलतो. अशी खीर आजारी व्यक्तीने पिल्यास त्यांना शक्ती मिळते असे मानले जाते.

Post a Comment

if you have any doubts, Please let me know

थोडे नवीन जरा जुने